रामजन्म
रामजन्म
रचना प्रकार ... #अभंग
जन्म आज झाला
हो रामरायाचा
क्षण आनंदाचा
हा सजला....
अयोध्या नगरी
न्हाली आनंदात
नाचली सुखात
तुजसाठी...
रामराज्य आले
कलीयुग गेले
स्वप्नांचे ते झेले
मी पाहिले...
असेच घडावे
मनातला भाव
घेईलची ठाव
विचारांचा....
जाऊ दे कोरोना
आरोग्य येऊ दे
सुख ते नांदू दे
रामराया....
तुझ्याच सारखा
दुजा नसे कोणी
भाकर व लोणी
मिळो जना...
खिन्न झाले मन
तूच रामा जाण
घालीते मी आण
तुज रामा...
निस्पृह भावना
दिसे नच आज
भ्रष्टाचार माज
फैलावला...
पुन्हा जन्म घ्यावा
मनात प्रार्थना
करीते साधना
निजधामा...
कृपा दृष्टी व्हावी
विनंती करीते
साकडे घालिते
चरणात....
