राजसा (गझल)
राजसा (गझल)
प्रेमात गुंततो तू हे राजसा कशाला
व्याकूळ होत जातो तू फारसा कशाला
उध्वस्त फार झालो प्रेमात वाहतांना
केलास भावनांचा तू कोळसा कशाला
सौंदर्य काल गेले भेदून काळजाला
देऊन प्राण आला तू पाडसा कशाला
प्रेमात काल होता बेधुंद पावसाळा
वाहून त्यात जावे रे पावसा कशाला
येथे क्षणात होतो वर्षाव चांदण्यांचा
चंद्रास मागतो मी ती लालसा कशाला
लावून आज गेली ज्योती कशास राणी
अंधार काळ रात्री तो कवडसा कशाला
फाडून काळजाला पाहून जा तुला तू
मग चेहरा बघाया तो आरसा कशाला

