राग
राग
बाह्य आणि आंतरीक कारणाने,माणसाला राग येतो,
रागामागे अहंकार हे कारण, शहाणा माणूस नमतं घेतो...
साठवलेल्या अतिरिक्त ऊर्जेने,माणसं रागवतात सातत्याने,
कृतिशील गोष्टीत स्वतःला गुंतवा,राग कमी होईल त्याने...
बाहेरून तुम्हाला कोणी, क्रोधी नाही बनवू शकत,
रागीटपणा तुमच्यावर अवलंबून, ते फक्त तुम्हीच असता बनवत
तोंडात साखर व डोक्यावर बर्फ,यशासाठी या गोष्टी आवश्यक,
रागाचं रूपांतर करा विधायक गोष्टीत, तेव्हा तो ठरेल प्रेरक...
