राधाराणी
राधाराणी
कृष्ण जमीनीवर कोसळणारी धार
राधा उलट वाहत जाणारे पाणी
जीवनातील सुख दुख शिकण्यासाठी
ऐकावी राधा-कृष्णाची प्रेम गाणी
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर राधा
प्रश्न अवघड असो वा साधा
काजव्याला बंद केले मी ह्दयात
संपेल का त्याचा अंधारा वनवास
भेटीस आला अमावस्येला तुझ्या काजवा
सैल करुन ठेव जरा तुझे बाहुपाश
गंध माझा वेगळा रंग माझा खास
माझ्या जादुने केले कित्येक मी दास
अमावस्येला असते काजव्याची आस
पोर्णिमेला तर असते चांदण्याची रास
मी चांदण्याची होता रास
मला काजव्याची असते आस
तुच माझा गुलाब तुच माझा गंध
मी तर रातराणी फक्त दरवळते सुगंध
तुच तर माझे हसणे अन् रडणे
ह्दयात नितांत तुझाच असतो वास
तुच माझा चंद्र तुच ता-याचा प्रकाश
चांदण्यात दरवळतो तुझाच सुवास
तुझ्या आठवणीचा ह्दयात होता ध्यास
सगळीकडे तुझाच नित्य मला भास
भिजुन झाले आनंदी तुझाच सहवास
तुझ्या भेटीत होता कोरडाच श्वास
सोडुन तुला जाताना नव्हता अठ्ठाहास
मी परत येईल येवढा होता का विश्वास
केलेस किती नखरे सोबत सोडताना
अपराध कोणता तुझाच दास होता

