राधा रमण
राधा रमण
वेड लागले राधेला
होई प्रेमात बावरी
कृष्णावरी ती भाळली
गोकुळीचा तो मुरारी
अविरत कृष्ण कृष्ण
सदा मनात चिंतन
ऐकू येतात शब्द ते
तेची बोलती कंकण
राधा रमणचे असे
प्रेम जगी आगळे
नसे जगी तया सम
भक्तीमय ते वेगळे
राधा रमणचे प्रेम
असे भक्तीचे प्रतिक
पहा प्रगटला दीप
प्रेम इतके सात्विक
ध्यानी मनी धनश्याम
मनी देवकी नंदन
रूप निहाळे हरीचे
विचारांचे चाले चिंतन