पत्नीच्या दहशतीतला अवकाश
पत्नीच्या दहशतीतला अवकाश
पत्नीच्या दहशतीतला अवकाश
कोरोनाच्या महामारीत सर्वत्र होता भयाचा जोर,
बायको अकारण वाजवी ढोल, उंच काढी स्वर.
पती कैदी झाला चार भीतीच्या भिंतीत,
नजरबंद अवस्थेत त्याचे जीवन झाले क्षीण.
महामारीत हरवले तिचे प्रेम, पती झाला शत्रू,
जो होता केव्हा तरी आजीवन मित्र.
घरकामाच्या ओझ्याने लागले दारूचे व्यसन,
बायकोची कटकटीने होत होते त्याचे खच्चीकरण.
कुत्र्याऐवजी पती झाला होता घररक्षक,
रिकामा पती तिला दिसत होता राक्षस.
आपदेत बायकोला मिळाली नेत्यासारखा संधी,
मूल आणि आईची झाली होती घट्ट जुगलबंदी.
कैदी-पतीवर होत होता जेलरसारखा अत्याचार,
घरकामामुळे, पतीची अवस्था ढासळली जीवापर.
त्यांची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर,
घरात पत्नीचा मुका मार ,बाहेर शासनाचा प्रहार.
शक्तिवर्धक पेयाचे सर्व मार्ग बंद केले,
त्यामुळे घरी अन्न पचवने अवघड झाले.
वर्क फ्रॉम होमने, पतीचे कबरड मोडले,
पतीला त्यांचे आरोग्य ढासळतांना दिसले.
वर्क फ्रॉम होमचे वास्तविक दोष जाणवले,
घरकामी पती मिळण्याचे तीचे स्वप्न साकारले.
पत्नी दहशतीमुळे पतीला श्वास घेणे अवघड झाले,
मग पत्नी दहशतमुक्त अवकाशाचे स्वप्न त्याने बघितले!
