STORYMIRROR

Arun Gode

Tragedy

4  

Arun Gode

Tragedy

पत्नी सचिव

पत्नी सचिव

1 min
2

  पत्नी सचिव 

माझं स्वप्न होतं – मोठा अधिकारी व्हायचं,

सुंदर, बहुगुणी सचिव माझ्या सेवेत असावी.

पण स्वप्नं स्वप्नंच राहिली, सामान्य आयुष्य जगत,

सेवानिवृत्तीपूर्वी मामुली पदावरच थांबलो.


सेवानिवृत्तीनंतर मात्र झालो पत्नीचा सचिव,

ती बॉस बनून रोज हुकूमशाही करत होती.

तिचं हे अनोखं वर्तन पाहून आठवत होतं,

नवविवाहित काळातील तिचं सभ्य आचरण.


लग्नानंतर प्रत्येक गोष्टीत होती तिची संमती,

पण बाळ झाल्यावर मनमानी सुरू झाली.

 दिवसागणिक तिच्या मनमानीची शिखरं वाढत गेली,

आणि मी शांतपणे सहन करत राहिलो.


मुलांनी स्थापन केली स्वतःची गृहस्थी,

त्यांचं आनंदी जीवन पाहून मला आठवली,

 ती प्रारंभिक विवाहित जीवनशैली,

पण मी सहन करत होतो पत्नीची मनमानी.


आता ती वाट पाहत होती, पतीच्या सेवानिवृत्तीची,

गुलाम पतीवर, तिला करावी होती रोज दादागिरी.

सेवानिवृत्तीनंतर, ती बनली कुशल षड्यंत्रकारिणी,

माझ्यावर झाडत होती रोज अकारण पत्नीशाही.


तिच्या या वर्तनामुळे, मी होत होतो फार दुखी,

 समस्या समाधानासाठी खर्च होत होती बुद्धी.

 माझ्या सरकारी सेवेत देखील होती, तीची समान भागीदारी,

 म्हणून पेंशनमध्ये देखील, कायद्याप्रमाणे अर्धी हिस्सेदारी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy