भीमाचे भीमकाय कार्य
भीमाचे भीमकाय कार्य
भीमाचे भीमकाय कार्य.
मूकनायक व बहिष्कृत भारत या वर्तमानपत्रांचे प्रकाशन,
समाजजागृतीचा दीप प्रज्वलणासाठी उभे केले महासंघटन.
वंचित बहुजनांच्या हक्कांचे करावयाचे होते संरक्षण,
साइमन कमिशनची सदस्यता आनंदाने केली ग्रहन.
मागासवर्गीयानचा आर्थीक,सामाजीक उत्थानासाठी अथक प्रयत्न,
महार वेतन बिलमध्ये अस्पृश्यांनसाठी न्याय्य, हक्कांची तरतूद छान.
वंचित बहुजनाच्या राजकीय अधिकारांचे करावयाचे होते संरक्षण,
राजकीय हक्कासाठी बाबासाहेबांनी केले मोठे तीव्र आंदोलन.
राजकीय आरक्षनाला महात्मा गांधीनी धरले नाही उचलून,
गांधीने दलित-आरक्षनाच्या विरोधात धरले आमरण उपोषण.
सहचारणी कस्तुरबांनी बाबासहेबांना केली विनंती घरी जावून,
महात्मा गांधींना द्या जीवनदान तोडून त्यांचे आमरण उपोषण.
महात्मा गांधी व बाबासहेब मध्ये झाला ऐतिहासिक पूना करार,
पूना करारामुळे अनुसूचित जाती व जमातींना मिळाले आरक्षन.
स्वतंत्र भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथम विधीमंत्रीचा सन्मान,
हिंदु नागरी संहिता बिलचे लोकसभेत केले प्रथमच सादरीकरण.
शिक्षीत अनुसूचित जाती व जमाती आहेत समाजाप्रती असावधान,
बाबासाहेबांचे मागासवर्गीय शिक्षीत तरुणाविषयी केले उदासीन विधान.
शिक्षीत अनुसूचित जाती व जमातीमध्ये बघितली होती आशाची किरण,
समोर राबवितील शिक्षित तरुण बाबासाहेबांचे मागासवर्गीय जनआनदोलन.
धर्म, मृत संस्कृतिमुळे अडथळतो मानव प्रगतीचा अभियान,
मानवी प्रगतीसाठी वाघिणीच दुध शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन.
हिंदु धर्मतील वर्ण-व्यवस्था,पांखड व षड्यंतरांमुळे येते अडचण,
दहा लाख अनुयायी सोबत नागपूरमध्ये केला बुध्दधर्म ग्रहण.
नागपुरच्या पावन भूमिला मिळाली जागतिक मान्यता,
बुध्द अनुयायीसाठी दिक्षाभूमि बनले एकमेव पावनस्थान.
बाबासाहेबांनी अनेक क्रांतिकारी पुस्तकांचे केले लिखान,
दी बुध्द एंड हिज धम्म आहेत सर्वश्रेष्ठ महत्वपूर्ण लिखान.
