STORYMIRROR

Arun Gode

Abstract

4  

Arun Gode

Abstract

आंबेडकरवाद

आंबेडकरवाद

2 mins
2

                     आंबेडकरवाद

वर्गाबाहेरून ज्ञान घेणारा होता अस्पृश्य शिष्य,

बुद्धीच्या सामर्थ्याने केली तत्कालीन व्यवस्थेची पराभवाची नोंद. 

आपल्या प्रतिभेने भीमरावांनी प्रज्वलित केली ज्ञानज्योत, 

विश्वात रचला इतिहास, होऊन विश्वज्ञानाचा प्रतीक.

 

देशाला दाखवले की बुद्धी सर्वांच्या जवळ असते,

ती कोणत्याही जातिव्यवस्थेची मालकी नसते.

प्रकृती कधी करत नाही मानवामध्ये असमानता, 

मग मानव का करतो अन्याय, क्रौर्य आणि विषमता?

 

सामाजिक-शैक्षणिक मागासपणा शूद्राला करतो पराभूत, 

धार्मिक गुलामगिरीचा अंत करू शकते फक्त शिक्षण.

मागासवर्गीय त्यांच्या हक्कांसाठी जागृत झाले तर, 

शिक्षणच उघडेल सामाजिक व आर्थिक प्रगतीचा मार्ग.

 

 धार्मिक गुलामगिरीचा शिक्षा करू शकते फक्त अंत,

मागासवर्गीय त्यांच्या शिक्षा,हक्कच्या प्रति नाही निरंतर जागृत.  

शिक्षामुळेच उघडेल शुद्राचा सामाजिक व आर्थीक प्रगतीचा रस्ता,

 धार्मीक,अध्यात्मिक वातावरण शुद्रासाठी कधीच नसते पोषित. 

 

धार्मिकता बनवते शुद्राला अज्ञानी,ते होतात त्रस्त आणि शोषित,

वैज्ञानिक स्वभाव सदा खोलते वास्तविक मानव प्रगतीचा रस्ता. 

आंबेडकर विचारांशी मागावर्गीयांना व्हावे पटकण दक्ष व परिचित,

आंबेडकर विचार अंगीकारणे हीच मानवी प्रगतीची वास्तविकता. 

 

सामाजिक,शैक्षणिक मागासपणा शुद्रला करतो पराभूत,

धार्मिक गुलामगिरी पासून मुक्तता हाच प्रगतीचा एकमेव रस्ता.

मातृभूमि आणि मागासवर्गीयांचा प्रगतीचे आंबेडकरच क्रांतिदाता,

धार्मिक पाखंडी असतात मागासवर्गीयांचे निरंतर प्रतिक्रांतिदाता.

  

मागासवर्गीयांमधे केव्हाच नको जागृकता व एकता, 

त्यांना नेहमीच वाटते समाजत असावी सदा विषमता. 

कारण मागासवर्गीयांची जागृकता आणि कायम एकता, 

नक्कीच करेल पाखंडी वर्ण-व्यवस्थेचा मुळासकट अस्त!

 

आंबेडकर विचारांनी पाखंडी वर्ण-व्यवस्था होईल क्षतिग्रस्त,

पाखंडी वर्णव्यवस्था झाली ध्वस्त,तर लाभार्थि होईल पराभूत.

धार्मिक मक्तेदार पोहचवतात आंबेडकरवादाला गंभीर दुखापत, 

धार्मिक मुद्यामुळे मागासवर्गीयांना मोठा तडा बसत असतो.

 

धार्मिक गुलामगिरीने मागासवर्गीयांची होते नित्य बुध्दीभ्रष्ट, 

मागासवर्गीयातील दुराव्यामुळे विकासमार्ग होतो क्षतिग्रस्त.

तथागत बुध्द म्हणतात ,ते मुक्तिदाता नाही फक्त मार्गदाता, 

महामानवाचे विचार दाखवेल मागासवर्गियांना प्रगतिचा रास्ता!

 

जर मागासवर्गीय त्याचा मार्गदात्याला अयोग्य समजतात, 

मागासवर्गीयात त्यांच्या हितासाठी कशी येणार मग तत्परता.

शिक्षा हेच मागावर्गियानंसाठी वास्तविक वाघणीनेचे दुध फक्त, 

शिक्षीत मागासवर्गीयच करू शकते वर्णवादी व्यवस्थेला ध्वस्त. 

 

धार्मिक पाखंड मागासवर्गीयांनसाठी अफिमाचा विषारी घुट, 

शिक्षाच करू शकते धार्मिक मक्तेदारांच्या योजनेवर आघात. 

धर्माच्या नावांवर मागासवर्गीय नाही देणार निवडणूकीत मत, 

बाबासाहेबांचे संविधानच धार्मिक गुलामीवर देवू शकते मात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract