पत्नी-कंप
पत्नी-कंप
पत्नी-कंप
पती-पत्नीच्या वादातून उठले महाभारत भयंकर,
कधी पत्नी, तर कधी पती खोलीबाहेर हद्दपार.
दोघेही हट्टाने उभे, कुणीही मानायला तयार नव्हते हार,
घरातल्या शांततेला मिळाला संघर्षाचा भार.
पत्नीने एक-एक करून सारे शस्त्र वापरले,
पण नवऱ्याच्या दृढ निश्चयासमोर ते सारे निष्फळ ठरले.
सदैव माघार घेणारा नवरा आज ठाम उभा राहिला,
पत्नीला आश्चर्य वाटले — तिचे सारे स्त्रीशस्त्र निष्प्रभ झाले.
सदैव माघार घेणारा नवराचे पत्नीला आश्चर्य वाटले,
तिचे सारे स्त्री शस्त्र यावेळस नाकाम कसे झाले.
मनात तिच्या सवतची शंका घर करू लागली,
असा प्रकार असेल तर,पतीशी टक्कर घेणे बेकामी.
तीच्या मनात नवऱ्याच्या घटत्या प्रेमाची लघु शंका आली,
ती पती कडून कशी काढून घ्यायची समस्या उभी झाली.
मग ती, पतीच्या अत्याचारांची नक्कीच शिकार होणार,
असं झालं तर,मग सरळ-सरळ ती पत्नीधर्माची हार.
असं झाल्याने तीची घरातील मूल्य सद्य घटणार,
आणि तीला कायमच पती वर्चस्व भोगावे लागणार.
चला, पतीवर आज प्रेमाचे पत्नी फासे फेकू या
मग माझी प्रतिष्ठा टिकेल आणि पती हारेल
पतीसोबत,त्या रात्री पत्नी खोलीत गेली,
डोळ्यांच्या खुनेने पतीवर प्रेममचे बाण सोडू लागली.
वास्तविक, भांडणाचे बर्फाळ वादळ कमजोर पडले,
पती मनात घाबरला, पत्नीची सक्रियता पाहून.
कसे चालेल, आजची काळी रात्री भयभीत होणून,
तो पत्नीच्या कुटनीतिक शस्त्राला गेला नाही शरण.
अचानक जोराचा आवाज गुंजला,घनदाट रात्रीचा पहाटी,
भूकंप – भूकंप, आला म्हणून ती खूप जोऱ्याने ओरडली.
नवऱ्याने डोळे उघडून, पाहिलं पलंगाच्या आजू -बाजूला,
शोधू लागला, कुठे गेली त्याची श्रीमती रात्री फिरायला.
जेव्हा पाहिले किंचित नजरेने चौहीकडे आणि खाली -वर
मोहन जोधडो हडप्पा चा, तो मौल्यवान अलंकार.
अस्त-व्यस्त अवस्थेत ती दिसली पडली जमिनीवर,
टिका करत नवऱ्याने, तिला विचारलं धैर्य सावरून.
थोडा वेळापूर्वी, तू तर प्राण प्रिये होती या पलंगावर,
प्रिय अर्धांगिनी नवऱ्याचं पलंग सोडून कशी जमिनीवर.
माझी प्रिय होनहार पत्नी, काय करत आहेस जमिनीवर?
तू तर नेहमी राहतेस, कुंभकर्ण झोपेत आपल्या पलंगावर.
काय चाललंय पृथ्वीच्या हृदयात, तुला कसं कळणार,
तुझ्या प्रेमाला लागली आहे ओहटी,तुला कसं समजणार.
जोरात भूकंप आला आणि मी एकदम हादरले,
आणि अचानक येवून पडले इथे जमिनीवर.
पत्नीच्या हालचालींमुळे नवरा होता जागा रात्रभर,
तरी भोळा नवरा थोडा आश्चर्यचकित झाला क्षणभर.
पत्नीच्या या अद्वितीय स्वरूपाला पाहून चमकला,
नवऱ्याने खोडसाळपणे विचारले प्रिय पत्नीला.
हे सांग की भूकंप, तू पडण्यापूर्वी आला,
की पडल्यानंतर, आला या भूमीवर.
पत्नीचा सौम्य,निरागस हास्य व चेहरा पाहून,
नवऱ्याने विचारलं,हा पत्नी-भूकंप होता कां हसून?
