STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy

पर्यावरण दिनानिमित्त *रक्षण*

पर्यावरण दिनानिमित्त *रक्षण*

1 min
221

खूप झाल्या घोषणा आता खूप झाले समाज कारण

वृक्ष लावा एक तरी होईल मग पर्यावरण रक्षण


झाडे लावून संवर्धन करणे हीच आपुली जबाबदारी

झाडे जगली तरच जगेल पृथ्वीवरचे सृष्टी सारी


वृक्षासारखा दाता नाही ऋषितुल्य कर्मकहानी

का रे ? मानवा तू रे केली निष्टुरपणे झाडाची छाटणी


जाणून घे जीव त्याचा दुःख होते त्यालाही

रीत माणसाची अशी कशी अंतर्मनात रडत राही


झाडे, वेली प्राणी पक्षी निसर्गाचा घटक आहे

स्वार्थासाठी का रे माणसा हव्यासापोटी मारत आहे


झाडे लावा झाडे जगवा मंत्र जपू या निसर्गाचा

वृक्षांगण खुलेेल धरतीचे गौरव करू या धरती मातेचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy