STORYMIRROR

Anita Bendale

Inspirational

3  

Anita Bendale

Inspirational

पर्यावरण आणि निसर्ग

पर्यावरण आणि निसर्ग

1 min
279

निसर्ग वृक्ष आमचे मित्र तयाना तोडू नका


धरती छाया करती माया

पसरूनी ही काया

पाने, फुले अन् फळे तयाची

लाखमोल ही किमया


जतन तयाचे करू या प्रेमा प्रेमानी

वृक्ष आमचे मित्र देती सारे

जे जे जवळी मनापासुनी

वृक्ष वृक्ष म्हणू की ऋषी

हे तर जनहितदक्ष

वसा त्यांचा देत राहणे

जपू या मनोमनी


निसर्ग आपला सुंदर

त्यावर करू नका घाण

त्यामुळे त्याला लागला जखमी सिहासारखा बाण


खूप लोक निसर्गाची करीत आहेत हानी

पण आपण सर्वांनी गायली पाहिजे निसर्गाची गाणी


नका करू रे प्रदूषण

निसर्ग आपला रडत आहे

निसर्गाला वाचवून पृथ्वी मातेला नटवायचं


निसर्ग आहे आपला जीवनदाता

म्हणून आपण म्हणू शकतो निसर्गाला माता


आपण निसर्गाला धोक्यातून वाचवण्यासाठी काही ना काही करू

नाहीतर आपण सर्वजण विनाकारण मरू


तू आहे आदी आता झालास अंत

एक पेरले तू आम्हाला भरभरून परत केले मान्य आहे


आम्हीच जबाबदार आमच्या शेवटाला

पाळीन नियम निसर्गाचे करेन तुझी रक्षा

वृक्ष लागवडीचे कर्म असे करावे

आरोग्यम धनसंपदा जीवन जगावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational