प्रवास
प्रवास
डोळ्यांनी पीऊन घ्यावा निसर्ग असा,
शब्द ही स्तब्ध व्हावा गाव ही तसा,
भाव उमटती चेहऱ्यावरती
आश्चर्याने स्तंभीत पहाणे,
ऐश्वर्य आपले पहाण्याजोगे
युरोपीयन तसेच राजघराणे,
दिडशे वर्ष राज्य केलं
हिंदूस्थानला बरेच दिले
कोहिनूर सारखे मौल्यवान
बरेच काही नेले,,
का नाही दिले मग
स्वच्छतेचे अन् शीस्तीचे धडे?
का आम्हीच पडलो
कुठेतरी ऊणे....
काश्मीरही आमचा निसर्गरम्य
त्याला बळकावणे अतिशय दुर्दम्य
भव्य दिव्यता आमच्याही कडे
कन्याकुमारी ते हिमालय कडे
तीन समुद्रांचे पाणीच पाणी...
फक्त नाही ईथे एक राणी,
राजकारणी काढत बसतात
एकमेकांची ऊणी दूणी
आणी जनता फेडते फक्त
अपरिहार्य देणी,
पण वीणा वर्ल्ड ने घडवली
ही युरोपची प्रवासवारी
त्यामुळे आम्ही त्यांचे
शतशः ऋणी
