मित्र
मित्र
मैत्री ची माझी एकच व्याख्या
फक्त माझ्या सर्व सख्या
मैत्री नसते कधीच ॠणी
असतात फक्त गोड आठवणी
हितगुज अन् गोड गुपित
दुःख ही सामावते तिच्याच कुशीत
कधी गप्पा गोष्टी, कधी गाणी
तर कधी असतात फक्त रडगाणी
कधी ऊत्तेजन तर कधी टीका
मैत्रीत नसतो कोणताच हेका
कधी रंगते अंगत पंगत
दूर राहिलो तरी सदैव संगत
विश्वासाने वृद्धिंगत होते
मैत्रीची वेल अशीच फुलत जाते
मैत्रीचा असा अमुल्य ठेवा
मनाच्या गाभार्यात छान सजवावा
