STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

परतफेड

परतफेड

1 min
1.4K


आई तुझ्या उपकाराची

कशी करू मी परतफेड?

करायची होती तुझी सेवा

तुझ्या जाण्यानं लागलं मला वेड...!!


सतरा धारा दूध पाजवून

केलंस मला लहानाचं मोठं

तूच शिकवलंस चालायला

अंगणी धरून माझं बोट....!!


प्रत्येक संकटात हिंमत तुझी

साद देवून जाते आई

तुझ्या अचानक जाण्यानं

एकटी पडले गं आई....!!


नसलीस तू म्हणून काय झालं

प्रत्येक गरीब बाईत दिसते आई

तुझ्या उपकाराची परतफेड

करू शकलो नाही.....!!


अनाथांना,वृद्धांना करते मदत

तुझी सर येणार नाही

तूझी पोकळी कशानेही

अजिबात भरून निघणार नाही....!!


खरा देव आईवडीलात आहे

नका सोडू त्यांना वृद्धाश्रमी

आता सरकारनेच उचलावी पावलं

घ्यावी का त्यांची हमी.....!!


जो सांभाळत नाही मायबापाला

पगारात त्यांच्या कपात व्हावी

अशी कांहीतरी युक्ती करून

मिळावी मायबापास चावी....!!


मायबापाच्या उपकाराला

जगात कसलेच व्याज नाही....

मायबापाविना जीवनाला

कसलाच साज नाही......!!


नऊ महिने नऊ दिवस

प्रसव वेदना झेलते आई

हाडाची काडं कलीस

तुझे उपकार फिटणार नाही....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational