STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy

4  

Shobha Wagle

Tragedy

परंपरा

परंपरा

1 min
195

संस्कारांचे देणे लाभले आम्हाला

तेच आम्ही समर्पित केले मुलांना

पण काळ आजचा फार बदलला

तंत्रज्ञानाचा नाद लागला तयांना.


आपले संस्कार लोप्त होत आहेत

पश्चिमी शैलीचा प्रभाव खूप वाढला

आपली परंपरा निकालात काढली

परकियांचा प्रभाव पिढीवर पडला.


आत्म मतलबी वृत्ती पिढीत दाटली

नाते संबंध किटकिट वाटे तरुणांना

विभक्त कुटुंबामुळे ते घडले असावे

आई वडिल साथ नको वाटे तयांना.


थोरां मोठ्या मान सन्मान विसरली 

घरचे खाणे बेचव, हॉटेल जाणे सुलभ

रिती रिवाज बुरसटलेले विचार समजे

आपुलकी माया झाली खूपच दुर्लभ.


पैशाने आज सर्व विकत घेता येत असतं

पण मूर्खांना कळत नाही ऋण फेडणे

सेवा सुश्रुता म्हातारपणी काळजी करण्या

ऐवजी तयांना वृध्दाश्रमी पैसे भरून सोडणे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy