प्रणय सागर
प्रणय सागर
धुंद अशा रातीला
प्रीत तुझी साथीला,
येऊ दे बहर आता
आपल्या या प्रितीला
बाहुपाश हा तुझा रे
शहारून टाकी अंग,
होऊनी मी बेधुंद
जाहले तुझ्यात दंग
मिठीत येऊनी तुझ्या मी
देहभान विसरले रे,
तृप्त करूनी मजला
स्वर्गसुख अनुभवू दे
चंद्राच्या साक्षीने
एकरूप होऊया,
सागरात प्रणयाच्या
दोघेही डुंबूया
तुही धुंद मीही धुंद
धुंद सारा आसमंत,
या मिलन रातीचा
होऊ नये कधीही अंत

