प्रितीचे पाखरु
प्रितीचे पाखरु
थवा पाखरांचा उडे गगनात
गगनात आनंद मावेना आज,
आज मी गगणी पाहिला थवा
थवा मज दिसावा गगणी रोज.
रोज मी पहातोय आकाशी चांदण्या
चांदण्या रात्री हे सुंदर चांदणे...
चांदणे फुलले माझ्या मनात
मनात आज मी गातोय गाणे.
गाणे प्रितीचे गातोय मी
मी स्वप्न प्रितीचे पहातोय,
पहातोय रोज गोरा मुखडा
मुखडा तो स्वप्नात येतोय.
येतोय थवा पाखरांचा रोज
रोज भेटतय प्रितीचं पाखरू,
पाखरु लई दिसे हे खट्याळ
खट्याळ पाखरासाठी लागे मी झुरु