परिणीता
परिणीता
गोडगोजिरी सोनकळी तू
नटलीस विविधआभुषणांनी
लाल शालू हा जरीकाठी
हात सजले हिरव्या चुड्यानी
केशसंभार तुझा तो कातिल
कुंतलाची लट गाली ओघळली
धुंद कुंदकळ्यांसह अबोली गुंफून
माळ तुझ्या केसातं माळली
लाजलिसं तू अशी प्रिया तुझे
लोभस साजिरे रूप निखरले
चेहऱ्यावर तो हात घेता
बघ साजिरे रूप तुझे मोहरले
हास्याची चंद्रकोर ती
गाली शोभे गोड खळी
अवखळ अल्लड परिणीता
भासे जणू तू सोनकळी
सजली मेहंदी हातावरती
कुंकू सजले तुझ्या भाली
लाजेचे ते गुलाबी रंग
तुझ्या सजले गोड गाली
काय उपमा द्यावी तुजं
तू नखशिखांत देखणी
तुझ्यावर कविता लिहिण्यास
माझी कमी पडे लेखणी........

