STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

प्रीतवेडी

प्रीतवेडी

1 min
12.1K

तुझ्या आठवणीत

जीव हा गुंतला

तुझ्या प्रेमात

जीव मी वाहिला.....,


    भेट पावसाळी

    धुंद आलिंगनात

    त्या धुंद वाटेवर

    कर्दळीच्या बनात.....


प्रीतवेडी मी राणी

ध्यानी मनी स्वप्नी

तुझ्याच आठवात

विविधरंगी ढंगात....


    फुलपाखरू मन

    माझं झालं

    पंख फुटले मला

     नभ छोटं झालं.......


उधाणल्या भावनांना

ह्रदयाची आर्त साद

प्रीतवेडी मी सजना

आसक्त हा प्रमाद......


    आठवणींच्या फुलोर्‍यात

    आज पुन्हा फुलताना

     प्रीतवेडी होते पाहते मी

     मला पुन्हा जगताना.....


हे जीवन सजना

तुझ्याचसाठी रे

हसते ,रडते मन

प्रीतीसाठी रे......

   

     माझ्या जीवनात

     आलास प्रीत घेवून

     प्रीतवेडी सजना मी

     संसारात गेले हरवून....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance