Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrudula Raje

Romance

5.0  

Mrudula Raje

Romance

प्रीतरंग

प्रीतरंग

1 min
136

अजून नाही उतरला पुरता प्रीतीचा रंग |

परी काहो धरला सखया परस्रीचा संग ||

राया तुमच्यासाठी सजवले ज्वानीचे भंडार |

नाजूक कायेवरी चढवला नवतीचा शृंगार |

वाट पाहिली याल तुम्ही, होऊन घोड्यावर स्वार |

परी काहो केला सजणा आशेचा भंग |

अजून नाही उतरला पुरता प्रीतीचा रंग ||

शालू पिरोजी, त्यावर ल्याले हिरवी मी कंचुकी |

लाल मेंदीने खुलला तळवा, डोईमध्ये केतकी |

मिठीत घ्या हो सजणा, साज हा लागू द्या सार्थकी |

होईन तुमची राधा, रमणा, व्हा तुम्ही श्रीरंग |

अजून नाही उतरला पुरता प्रीतीचा रंग ||

चंदनाची उटी न विझवी हिर् दयाची आग |

कोण भेटली सवत तुम्हा, मज येई तिचा राग |

रानोमाळी हिंडीन, शोधीत सख्या तुझा माग |

खुलवीन, भुलवीन पुन्हा राया, बांधीतसे चंग |

अजून नाही उतरला पुरता प्रीतीचा रंग |

परी काहो धरला सखया परस्रीचा संग ||

Rate this content
Log in