प्रीतीचा वसंत
प्रीतीचा वसंत
ती दिसली,मन फुललं
वसंत बहरला हृदयात
मंजूळ वारा स्पर्शून गेला
प्रीतीचं रोप उगवलं मनात
नयन सुख तिच्यामध्ये
वाट धरती डोळे
तिच्या चाहूलाची भाषा
शब्दाविना बोलती डोळे
शब्द कधी ना बोलके
नयनात साठवलं फार
ती येता जवळी
हवेत वाढतो गार
प्रीतीचा वसंत बहरला
रंगीन झाले जीवन
तीच्या प्रेमात मी खेळतो
वसंतात आला सावन
तिच्या प्रेमात
हरपून भूक तहान
क्षणभर होता डोळ्याआड
मन फिरते रानोरान