STORYMIRROR

Sanjay Gurav

Romance

3  

Sanjay Gurav

Romance

प्रीतगंध

प्रीतगंध

1 min
272

काजळ काळी गर्द रात

प्रिय तुझा हाती हात

लयीत होती मारवा गात

दोघे छेडू प्रेमाची बात.


अबोल पाकळी खुलावी

प्रीत पदरात तू तोलावी

कणाकणाने प्रिया उमलावी

मीठीत स्पंदने मग बोलावी.


अशीच जावी उत्तररात्र

फुलावे रोमांचे गात्र गात्र

किंवा गोठावे प्रीतीचे सत्र

प्रणयाचे मांडावे अग्निहोत्र.


तृप्तीची लाभावी ती सीमा

ज्वर धुंदीचा चढावा रोमा

परिणामाचीही नसावी तमा

प्रीतगंध तो दरवळावा धीमा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance