STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

4  

Prashant Shinde

Romance

प्रीत

प्रीत

1 min
284

१)प्रीत....!

काही ही हं...!

मऊ मऊ खावा भात

निघोनिया जाता दात

कशास करावी उगा बात

टाकोनिया पुन्हा कात

आठवणीत सरते रात

वासाडी मूलखाची जात

शांत झाली जरी वात

तडफडतो जीव वणव्यात

पुन्हा पुन्हा गीत गात

घालोनिया जुनी रुजवात

करू म्हणे प्रीत बात

पुन्हा करोनिया नवी सुरुवात

सुकला जरी गुलाब

तरी प्रीत ती आठवणीत

खुणावते द्वाड रात

करण्या बात साठवणीत

फिरोनिया येई चांद रात

मनसुबे मनोमनी खात

होईल का कधी सुरुवात

डुंबण्या त्याच त्या जुन्या प्रेमात....?

हसली प्रीत जुनी

स्वप्नी येऊन मनी

म्हणे काही हं हनी

उठ आता आला सनी....!

सुप्रभात...!

©प्रशांत शिंदे,कोल्हापूर

prashants9606@gmail.com

8007740679


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance