प्रीत
प्रीत
मन मोहरुन
प्रीत ही हसावी
मेंदीच्या रंगात
गडद रंगावी
चांदण्यांच्या नभी
उंचच उडावे
प्रितीचे मनोरे
गातच फिरावे
लाजरी बावरी
प्रीत ही फुलावी
प्रेमाच्या कुशीत
रात ही जागावी
स्वप्नात तुझ्या मी
सदा मोहरावे
हसरे चांदणे
नित्य ते दिसावे
थंडीत गुलाबी
शिरशिरी यावी
तुझी उबदार
मिठी घट्ट व्हावी