प्रीत फुलू दे अापुली....
प्रीत फुलू दे अापुली....
पाहिलं पाठमोरं तुला मी
माझा असल्याचा भास झाला
परंतु, तो दुसराच कोणी होता
न्याराच कोणी काकड मिशीवाला...
मी वाट तुझी बघता तेव्हा
दु:ख मनी दाटले राजा
तू अजून देणार किती मला
न केलेल्या चुकीची सजा...
प्रेम सागरात जणू पडले
दवबिंदू अन् मोत्याचा जन्म
प्रीत फुलू दे अापुली आता
नकोच असे रूसणे फुगणे..
गजऱ्यातली सुमनेही सुकली
होता तुझ्या प्रितीचा नजराणा
ये जवळ घे अलगद तू मजला
अव्हेरू नको तू वादा निभव ना...

