STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance

4  

Ajinkya Guldagad

Romance

प्रेमऋतु....

प्रेमऋतु....

1 min
562

भेटीचा क्षण तो आपुल्या.... सांग ना तुला आठवतो का..?

राहून राहून जीव पुन्हा....त्याच आठवणी साठवतो का..?

नजरेच्या तुझं ते,बाळ तान्ह...स्वतःलाच शोधत बसतंय का..?

अलगद झुलणाऱ्या आठवणींच्या झुल्यात...हिंदोळा घेत बसतंय का....?

कधीही न रमणार मन तुझं....प्रेमसरींत भिजतय का....?

बोलतांना जे कधी,आटून जायचं...सगरासारखं भरतय का....?

डोळे मिटतांना सपान माझं...ताऱ्यासारखं तुटतंय का...?

चांदण्या मोजण्याच गणित तुझं....चंद्रावाचून चुकतंय का...?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance