प्रेमळ नाते
प्रेमळ नाते
नाते सुंदर निर्मळ
जसे कोरे कागदच,
रंग भरू या मैत्रीचे
खुलवण्या जीवनच.
विश्वासाचे रंग भरू
बंधुभाव मनी ठेवू,
त्याग समर्पित भाव
मैत्री मनात जागवू.
हात देऊ एकमेका
राहू सोबत प्रसंगी,
धीर देऊन दुःखात
सुख भोगू अतरंगी.
मैत्री नाते जपताना
मोहमाया नको त्यात,
तुझी माझी एक स्थिती
दिसे प्रेमळ नात्यात.
चुके ठसे पावलाचे
मित्र त्यास सुधारते,
पूर्ण करण्यास इच्छा
मैत्री मार्ग दाखवते.
