प्रेमावर बोलू काही
प्रेमावर बोलू काही
चाल सखे प्रेमावर बोलू काही
राज दिलांचे चल खोलू काही
दोन घडी जरा बस या वाळूंती
चंद्र निघे तेव्हा मग चालू काही
रान कसे पेटे प्रीत होते तेव्हा
काळ प्रिये एकांतात घालू काही
थेंब तुझ्या गालावर थंडी पाडे
चिंब जलांचे शावर झेलू काही
लाट किनारी सांगत आली वेगे
मार मिठी लाटेवर डोलू काही
मौन तोडू सर्व तनाचे आता
देह असे देहावर तोलू काही

