STORYMIRROR

Babu Disouza

Romance

3  

Babu Disouza

Romance

प्रेमार्जव

प्रेमार्जव

1 min
127

आयुष्यभराची साथ दे ग तू मला

घटकेच्या मौजेचा नकोय मामला


सुखदुःखे एकमेका वाटून घेऊ, 

पावन कर जीवन सखी निर्मला -१-


गंधाळू दे सहवास हवाहवासा

जवळ घे मज सखे मनकोमला -२-


चंचल भ्रमरांचे थवे घोटाळती

अतिक्रमणा हुसकावू दे अमला -३-


भिरभिरती फुलपाखरे भोवती

जाळे लावून राखू दे नीलकमला -४-


रसपाना पक्षी आतुर रूंजी घेती

नवनीत चाखाया मलाच जमला -५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance