प्रेमाची साद
प्रेमाची साद
जीव कासावीस होतो
येता आठवण तुझी
साद घालतो तुलाच
ऐक जरा सखे माझी
ऐक जरा सखे माझी
एक मागणी हक्काची
भेट नको प्रत्यक्षात
पण घडावी स्वप्नाची
पण घडावी स्वप्नाची
बोल जरा प्रितवाणी
कळू दे काय मनात
किती तू प्रेम दिवाणी
किती तू प्रेम दिवाणी
सांग नजरेच्या वाटे
होता संवाद डोळ्यांचा
प्रित अधिकच दाटे
प्रित अधिकच दाटे
रानोमाळ गंधाळले
सखे तुझ्या संगतीने
नव जीवन लाभले
नव जीवन लाभले
अर्थ जीवनास आले
क्षण प्रितीचे जगता
मन समरस झाले

