प्रेमाची चाहूल
प्रेमाची चाहूल
मनी हुरहूर
कळेचना मज काही
तुज पाहता हृदयी काहूर
येता समोरी तू
शब्दही ओठी फुटेना
नजरेचीच भाषा बोल तू
लागली साजना
मज प्रेमाची चाहूल
मनही कशातच लागेना
ओलावा प्रेमाचा
बहरत राहो सदा
जसा गंध रातराणीचा
सोबत असावी
चंद्र नि चंद्रीका जशी
साथ सदा तुझीच मिळावी

