प्रेमाचे महत्व
प्रेमाचे महत्व
विचार ना त्या गुलाबाच्या फुलाला,
दुसऱ्याचा आनंदासाठी स्वतः मात्र तुटत असतो, थोड्या वेळाचं आयुष्य आहे माहीत असूनही पुन्हा नव्या उमेदीने बहरत असतो
मनातील भावना व्यक्त कसे करू समजत नाही मला माझ्या प्रेमाचं महत्व कधी समजेल तुला..
विचार ना त्या पर्जण्याला,
पावसाच्या सरीत फक्त शरीर भिजतं
पण तुझ्या आठवणीत रोज मन भिजतं,
डोळ्यातील भावना सहज समजतात,
पण तू समोर येताच मनातील भावना अबोला धरतात मनातील भावना व्यक्त कसे करु समजत नाही मला माझ्या प्रेमाचं महत्व कधी समजेल तुला..
विचार ना त्या मनाला,
माझ्याविना करमतं का त्या मनाला
बोलायचं तुला खूप काही असतं,
पण सावरावं लागतं ना त्या मनाला,
अजून किती आवर घालणार त्या मनाला,
आता तरी व्यक्त होऊ दे तुझ्या मनातील भावनांना, काय बोलू कसं बोलू कळत नाही मला माझ्या प्रेमाचं महत्व कधी समजेल तुला..
