STORYMIRROR

Dinesh Kamble

Romance

4  

Dinesh Kamble

Romance

प्रेमाचा गुलकंद

प्रेमाचा गुलकंद

1 min
869

ह्या कातरवेळी तू मी 

आणि हा एकांत असावा 

दोघांच्याही मनातला 

वादळ वारा अशांत असावा 


श्वास दोघांचे एकरूप व्हावे 

समिप येतांना अधीर थरथरावे 

घट्ट पडावा विळखा 

नाजूक कराचा रांगड्या देहाला 


मंद व्हावे दिवे सारे 

प्रकाश पडावा तुझ्या रूपाचा 

तृष्णा मिटू दे माझ्या मनाचीं 

दे घोट भर रस तव यौवनाचा 


रेशमी या वस्त्राआड का 

लपवून बसलीये कोमल काया

बंद नाजूकसे अलगद सैल कर 

कर माझ्यावर मनसोक्त माया 


मोकळा तू सोडुनी द्यावा 

गर्द काळा केशसंभार तुझा 

सांग कसा कुठवर सोसणं तू 

मंदाकिनी हा मदनाचा भार तुझा


पाकळ्या तव ओठांच्या 

बस राख रखे अबोल तू 

भाव सारे मनातले जे 

नेत्र बाहुल्यांनी सारे खोल तू 


जीव झाला उतावीळ हा 

बांध प्रेमाचे फुटू दे 

ये माझिये समिप सजनी 

प्रेम गुलकंद लुटू दे 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance