Ajay Nannar

Romance


4  

Ajay Nannar

Romance


प्रेम

प्रेम

1 min 223 1 min 223

प्रथम तुज पाहता,

हरपलो मी ध्यान...


   तु जवळ नसता, वेडापिसा मी,

   जणू विसरतो माझे प्राण....


     ते दुराव्याचे क्षणही

     क्षणभर सुखावतात...

     जेव्हा,

     मनाच्या तळहातावर

     तुझ्या आठवांची  फुलपाखरे 

     अलवार विसावतात...


जगाच भान रहात नाही आता,

तुझ्या विचारांत गुंतताना...

माझा मी़ आता उरत नाही,

तुझ्या आठवणींत हरवून जाताना

तुझ्या आठवणींत हरवून जाताना

          

अश्रुंच्या ओंजळी,

       आज डोळा भरुन वाहिल्या,

        मनात आठवणी मात्र तुझ्या,

         अगदी तशाच भरुन राहिल्या....


Rate this content
Log in

More marathi poem from Ajay Nannar

Similar marathi poem from Romance