STORYMIRROR

Akash Mahalpure

Tragedy

4  

Akash Mahalpure

Tragedy

प्रेम

प्रेम

1 min
290

प्रेम केले होते तिच्यावर,पण तिला ते ओळखताच आले नाही,

मी तर नेहमी तिचाच होतो, पण तिलाच माझे होता आले नाही,

माझ्या मनातील खरे प्रेम, तिला कधी पाहताच आले नाही,

डोळ्यांसमोरून दूर केले तरी, मनातून तिला काढताच आले नाही,

तिच्या विरहाचा दु:खातून, अजूनही बाहेर पडता आले नाही,

खूप प्रयत्न करूनदेखील, तिला विसरताच आले नाही,

ती सोडून गेली तरी, मला तिला सोडताच आले नाही,

चार चौघात मला कधीच, मनमोकळे हसताच आले नाही,

सात पावलेही आज तिला, माझ्याबरोबर चालता आले नाही,

सात जन्माचा जोडीदार जिला मानले,

तिला या एका जन्मातसुध्दा माझे होता आले नाही!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy