प्रेम
प्रेम
रूप हे तुझे मनोहारी
मऊ मुलायम तव स्पर्श
आलिंगन देताच सखी
होतोय मनालाच हर्ष
झालो वेडा मी प्रेमात
नको मला झिडकारू
प्रीत केलीय मी तुजवरी
कसे तुजला मी विसरू
यौवनाची कळी तुझी
फुलू दे माझ्या स्पर्शाने
होऊन जाऊ दे धुंदफूंद
ये मिठीत सखी हर्षाने
करतेस नजरेने तू इशारे
मिसळू देत श्वासात श्वास
मी प्रेमीक तू प्रेयसी माझी
मजसाठी आहेस तू खास
उर्मी वाटतेत या जीवनात
तुझ्या या गोड सहवासाने
पेटतोय आज श्वास माझा
तुझ्या एकाच बघ स्पर्शाने

