प्रेम
प्रेम
नदीतीरी त्या, माझ्या प्रियाचे,
दूर एक छोटे झोपडे होते l
रोज येउनी मज भेटण्याचे,
छंद त्यांस जीवा जडले होते l
प्रेमाने मोगऱ्याचा गजरा केसात,
माळन्याचे रोजचेच प्रियाचे होते l
नसता प्रिया सोबती, हे फुलांचे गंध,
मंद, धुंद दरवळत,नशिले प्रेम जावळी होते l
सूर्य,चंद्र ,तारे, नदी ,फुले ,सारे,
आमच्या प्रेमाचे साक्षीदार होते l
या नदीतीरी एकेक फांदी, पेंडा,
करुनी गोळा झोपडे बांधले होते l
झोपडे नसूनही या राणी साठी,
राजाने ताजमहालच बांधले होते l
एक तो दिवस अशुभ असा उगवला,
सूर्यास ही दडउनी सर्वत्र काळोख पसरले होते l
दुष्ट लागली वाईट आमच्या प्रेमास,
जणू सारी धरती, आकश रडले होते
जोराच्या त्या भयाण वादळाने,
पूल तुटूनी, झोपडेही मोडूनी गेले होते l
काय ते देवास माहित,विरहाचे,
भोग असे हे नशिबी आले होते l
मोडक्या झोपडी जवळी बसूनी,
डोळे प्रियाच्या वाटेस लागले होते l
माझ्या अश्रूंनी वाहून कधी नदीस ,
पुराने पाणी ओसंडून वाहिले होते l
कधी दाटुनी अश्रूही, होत कोरडी,
नदी, झाडे, फुले सारे सुकले होते l
कधी सूर्य ,चंद्र ,तारे यांच्याही,
डोळ्यांत अश्रुंचे तवंग दिसले होते l
रोजचं त्या तीरी, नजरेने शोधत,
बसण्याचे मज वेड लागले होते l
दिवस खूप सरले, डोळे थकले ,
मनाने काळजाने ना आशेस सोडले होते l
हुरहुर लागुन जीवास, तडफडत,
काळीज,प्राण कंठाशी आले होते l
एक दिवस कोणीतरी पोहूनी येत ,
त्या तिरा वारूनी, मज भासले होते l
जवळ येता,दिसे माझाच प्रिया,
मज भेटण्याची तगमग,प्रेम नजरेत होते l
एकमेका मिठीत सामावून आमुचे,
सारे दुःख,भान,हे आनंदात विसरले होते l
मोडके झोपडे पुन्हा प्रेमाने बांधून,
प्रेम आमचे सर्वा साक्षीने बहरले होते l
सूर्य-चंद्र ,झाडे ,फुले ,धरती, आकाश,
सारेच खुदुखुदु गाली हसत आनंदी झाले होते |

