प्रेम
प्रेम
प्रेम हा सगळेच केलेल्या कृत्य
कोणी उघडपणे
कोणी लपून छपून...
प्रेम सगळ्यांनीच भोगलेले भोग
कोणी रडत रडत
कोणी हसत हसत...
प्रेम सगळेच झेललेले
कोणी सुखाने तर
कोणी दुःखाने...
प्रेम सगळ्यांचेच डोळ्यात
कोरडे असतील
किंवा पाणावलेले...
प्रेम सगळ्यांचाच जीवनात
कोणाच्या स्वप्नात तर
कोणाच्या सत्यात...
प्रेम सगळ्यांचाच आठवणीत
मग तो या प्रेम युद्धात
जिंकलेला असेल
किंवा हरलेला...

