प्रेम
प्रेम
अथांग सागर तो पसरला नाही त्याचा थांगपत्ता
उधाण लाटेची आहे त्याच्यावर ठाम सत्ता
प्रेमाने नदी वाहात येते, होते एकरुप येते त्याला भरती
चंद्र चांदण्यांचाही खेळ नभात रंगतो वरती
दरीही आहे चित्तचोर काळ्याभोर डोंगराची सावली
तिचे आकर्षण प्रेमाचा हा रंग वेगळा असला जरी
प्रेमाने न्हाऊन निघावे ही कल्पना खरी