प्रेम ते हेच का
प्रेम ते हेच का
किती चुंबिले ओठ बागेत माझ्या
ठसा लाल लावून भांगेत माझ्या
कशाला तू रे प्रीतिचे सोंग केले
निजाया सदाकाळ काखेत माझ्या
किती भोगले सोसले व्रण मी रे
अश्रूंची फुले वाहुन प्रेमात माझ्या
कशी तू विकाया निघाला पले ती
दिला का दगा भूतकाळात माझ्या
असा हाणला घाव तू काळजाती
धरा जाय दुभंगून ऊरात माझ्या
तुला प्रेम भावे मिठी मारुनी मी
स्विकारी तुझे ओठ ओठात माझ्या
पिळूनी मला, देह केलास मूर्ती
नको तू मला मंदिरात माझ्या
दिवाना पळे भंगून देह माझा
फळे अंश त्याचाच गर्भात माझ्या
कसा खेळतो बायकोच्या तनाशी
फिरे हात घालून हातात माझ्या
असे प्रेम ते हेच का, आणली ही
तुफाने अशी धुंद रात्रीत माझ्या

