प्रेम शब्दांत रेखाटू कसे?
प्रेम शब्दांत रेखाटू कसे?
तुझं माझं प्रेम निरागस
शब्दात रेखाटू कसे?
तुच माझा प्रियसखा
हा भाव मनी जपला असे
मखमली भावनांचे
रेशीमबंध बांधू कसे?
निरागस अपुले नाते
शब्दात गुंफू कसे?
गुंतलेल्या जीवाला
प्रीतीतून सोडवू कसे?
गंधाळल्या भावबंधांना
तुजपासूनी अडवू कसे?
अंतरंगी रंगलेल्या वेलींना
सख्या सावरू कसे?
पापणीतील स्वप्नांना
लेखणीतून आवरू कसे?
प्रीतवेडे बोलके भाव
कवितेत उतरवू कसे?
शब्दांचे हे मृगजळ
शब्दांतुन उजळवू कसे?

