Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sunil Deokule

Romance

2  

Sunil Deokule

Romance

प्रेम म्हणजे?

प्रेम म्हणजे?

1 min
7.1K


प्रेम म्हणजे?

प्रेम म्हणजे खळखळणा-या

थंड झ-याचे पाणी

प्रेम म्हणजे सळसळणा-या

मंद वा-याची गाणी

प्रेम म्हणजे भळभळणा-या

रक्ताची धार

प्रेम म्हणजे रिमझिमणा-या

पावसाची मार

प्रेम म्हणजे लुडबुडणा-या

मनी माऊचा स्पर्श

प्रेम म्हणजे हळहळणा-या

दुःखी मनाला हर्ष

प्रेम म्हणजे वळवळणा-या

नागिनीचा दंश

प्रेम म्हणजे जीव जगवणा-या

अमृताचा अंश ....

प्रेम म्हणजे जळजळणा-या

आगीचा तांडव

प्रेम म्हणजे थंडावणा-या

बर्फाचा मांडव

प्रेम म्हणजे तडफडवणा-या

विरहाची धग

प्रेम म्हणजे मिसळणा-या

दोन जीवांचा ढग

प्रेम म्हणजे तेजाळणा-या

सुर्याशी संग

प्रेम म्हणजे उधळणा-या

इंद्रधनुष्याचे रंग

प्रेम म्हणजे न उलगडणा-या

विज्ञानाचा ध्यास

प्रेम म्हणजे जग व्यापणा-या

तंत्रज्ञानाचा भास

प्रेमभावना कधीच नाही शब्दात मावणारी

प्रेम असते फक्त जाणीव हृदयात मावणारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance