STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Romance

प्रेम कधी ग जुळायचे?

प्रेम कधी ग जुळायचे?

1 min
214

वसंत आला वेलीवरती फुल कधी गं फुलायचे?

तुला कळेना भाषा माझी, प्रेम कधी गं जुऴायचे?


सुगंध माझ्या श्वासामधले वातावरणी विरायचे?

सांगू कसे मी? बोलू कसे मी? मनी किती मी उलायचे?


गीत अंतरी कसे स्फुरायचे? सुरावटीने झुलायचे?

विसरुनी माझे मीपण कितीदा तुझ्यावर मी भुलायचे?


ह्या स्वप्नाळू वयात कितीदा स्वप्नी मी बघायचे?

ओठावरली हरवून बोली, मी डोळ्यांनी बोलायचे? 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance