प्रेम हे खुळं असतं अन् ते बावरं असत
प्रेम हे खुळं असतं अन् ते बावरं असत
आकाशी झेप असते पाखरांची
माझी झेप असते तुझ्या मनवरती
गंधळलेल्या ह्या मनाने
छेडल्या तुझ्या मनाच्या तारा
ना असते रिमझिम मनातल्या विचारांची
ना असते टिप टिप ह्या डोळ्यातल्या आसवांची
डोळ्यातल्या आसवांना थांब कसे म्हणावे
अन् तुझ्यावर प्रेम करायला थंबाऊ मी कसे
गडगडाट असतो आकाशातल्या ढगांचा
मनाचा कोंडमारा असतो जीवाला जीव तसा
कोसळतो पाऊस हा मनाला भावतो जसा
आनंदित करून जातो मनातल्या गाभाऱ्याला
कधी तुझे अन् कधी माझे प्रेमाला अंत नाही
झुरते मन माझे हे तुझ्या भेटीपाई
होतो नुसता मनाचा गोंगाट हा
हा खेळ चाले माझ्या प्रेमाचा अन् तुझ्या प्रेमाचा
तुझ माझं काही नसतं प्रेम हे असच असत
जे खुळं असत अन् ते बावरं पण असतं

