STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Others

4  

manasvi poyamkar

Romance Others

प्रेम..एक गुपित

प्रेम..एक गुपित

1 min
310

एकदा तिने हसुन विचारले

एक गुपित आहे मनात

काय असत हे प्रेम म्हणजे

सांगशील का कानात....

बघत राहिली मला ती

गोंधळलेल्या चेहर्याने

सांगून टाकावे का सारे तिला?

विचारलं मला माझ्या मनाने.....

मी मात्र कळत असुनही आणला

न कळल्याचा आव

निशब्द होवुन न्याहाळत राहिलो

तिच्या अजाण नजरेतले भाव

अगदीच न कळावे तिला

इतकी वेडी ती मुळी नव्हती

साळसूदपणाचा आव आणणारी

परी माझी खुळी नव्हती

सांगितले मग मीही तिला समजाऊन

प्रेम म्हणजे काय असत हे कळत नाही प्रेम केल्यावाचुन

ज्याच्यासोबत जगण्यात प्रत्येक क्षणाला असतो अर्थ

ज्याच्याशिवाय जगणे म्हणजे श्वास असुनही व्यर्थ

अशी हुरहुर जेव्हा जागी होइल मनात

तेव्हा समझ तू पडली आहेस प्रेमात ......

जेव्हा वाट सुखद वाटेल

त्याच्यासोबत चालताना

जेव्हा स्वर सुरेल वाटतील

त्याच्यासोबत बोलताना

अशी चाहुल जेव्हा जागी होइल मनात

तेव्हा समज तू पडली आहेस प्रेमात......

हसुन मग ती हळुच म्हणाली

इतकेच जर कळते प्रेम तर प्रेमाने कधी वागशील?

तुझ्या मनातले प्रेम मला कधी सांगशील..

अस नाही आहे की तुझे इशारे मला कळत नाही

तुझ्या नजरेची अबोल भाषा

माझ्या बोलक्या नयनाना कळत नाही...

तू न बोलताही मी समजून घेतले आहे प्रेम तुझे

आयुष्यभर तुझी साथ देण्यास सज्ज आहेत मन माझे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance