प्रभात काळी
प्रभात काळी
प्रभात काळी
आदित्य उगवला
तो चमकला...
प्रभात काळी
सडा पडे फुलांचा
जाईजुईचा......
प्रभात काळी
पूर्व दिशा उजळी
कानी भूपाळी......
प्रभात काळी
वसुधा हो सजली
मनी लाजली.....
प्रभात काळी
वासुदेव होआला
नाद घुमला.......
प्रभात काळी
लगबग हो भारी
कामात नारी......