.....पण हे आमचे मातृप्रेम
.....पण हे आमचे मातृप्रेम
असे आम्हाही घरदार
असे पिल्लूही रुबाबदार
पण हे आमचे मातृप्रेम शोभती पत्नी शूरवीर
कधी सामावून जातो तिरंग्यात
कधी वितळून जातो बर्फात
कधी विरघळून जातो अणुत
पण हे आमचे मातृप्रेम इच्छिती सेवा अखंडित
जन शोधती अमृते
नानाविध करती व्रते
पण हे आमचे मातृप्रेम नेती आम्हा अमरत्वे
जीव देती प्रेमासाठी
जीव घेती प्रेमासाठी
पण हे आमचे मातृप्रेम मागती जन्मोजन्मींच्या गाठी
