STORYMIRROR

Anonymous None

Romance

3  

Anonymous None

Romance

पल्लवी

पल्लवी

1 min
14.9K


डोळ्यातून बोलती पाखरे

केसांवरती झुलती अक्षरे.

ओठावर शब्द झरझरे

सप्तसूरच जणू तू भासे.

मंजुळ वाणी मंजुळ हसू

किमया नाजूक सुरांची

चंद्रकोर ओष्ठसुमने तुझी

कसरत बेधुंद मनाची.

पल्लवीत तू भावना सार्थ 

वर्षावातील शीतल पाणी.

प्रांजळ स्पर्श प्रांजळ अर्थ

खोल मनातील मधुर गाणी.

फुलराणी बहरतेस क्षणात

प्रफुल्लीत स्पंदने माझी.

हर्ष लाभे तुझ्या दिसण्यात

पालवी तू हृदयी माझी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance