STORYMIRROR

विजयकुमार देशपांडे

Comedy

3  

विजयकुमार देशपांडे

Comedy

फॉरवर्ड तुझे.. डिलिट माझे..

फॉरवर्ड तुझे.. डिलिट माझे..

1 min
576

बसल्या बसल्या

घरातून मित्राशी 


सुरू झाली मोबाईलवर

एकमेकांत चौकशी


काय झाले रे बोटाला

पट्टी का बांधलीस अशी 


रोज चोवीस तास

मोबाईल असतो हाताशी


व्हाट्सअपवर करतो मी

पोस्ट "फॉरवर्ड"तुजशी


त्यामुळे सुजली तर्जनी

पट्टी बांधली आहे अशी


पण.. तुझ्याही बोटाला

पट्टी बांधलेली कशी


चोवीस तास माझाही

असतो मोबाईल हाताशी


"फॉरवर्डेड"वाचायला

तू मला सतत पाठवशी


ते सगळे वाचायला

वेळ कुठे माझ्यापाशी?


"डिलिट" करतो प्रत्येक

व्हिडिओ/पोस्ट कशीबशी


झाली माझ्या बोटाची बघ

शेवटी दुर्दशा ही अशी!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy